शिवसैनिक हिच बाळासाहेबांची संपत्ती- राऊत

Last Updated: Wednesday, February 15, 2012 - 16:21

www.24taas.com, मुंबई

 

गेल्या ४५ वर्षात देश आणि राज्याच्या रक्षणासाठी उभे राहिलेले लाखो शिवसैनिक हिच बाळासाहेबांची संपत्ती असल्याचा पलटवार संजय राऊत यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांच्यावर केला आहे.

 

घोटाळ्यांमध्ये अडकलेल्य़ा कृपाशंकरांना त्याचं मोल काय कळणार असा टोलाही त्यांनी हाणला आहे. सामनातून संपत्तीबाबत होणाऱ्या लिखाणानंतर कृपाशंकर यांनी बाळासाहेबांना संपत्तीची अदलाबदली करण्याचे आव्हान केलं होतं. शिवाय आपली एवढी संपत्ती नसल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या आव्हनाला संजय राऊतांनी उत्तर दिलं आहे.

 

२जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील आरोपींनी मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्यासाठी पैसा ओतल्याचा आरोप 'सामना' या आपल्या मुखपत्रातून कृपाशंकर सिंग यांच्यावर करण्यात आला आहे. झोपडीतून आलेल्या ३५० कोटींची माया कृपाशंकर यांनी जमवली कुठून असाही प्रश्न विचारण्यात आला आहे.

First Published: Wednesday, February 15, 2012 - 16:21
comments powered by Disqus