अधिवेशनात शिक्षकांच्या डुलक्या

नवी मुंबईत भरलेल्या शिक्षक अधिवेशनात राज्यभरातल्या शिक्षकांनी हजेरी तर लावली. मात्र या अधिवेशन स्थळी शिक्षकांचा भर, चर्चेपेक्षाही अवांतर गोष्टींमध्येच जास्त दिसून आला. 

Updated: Feb 7, 2016, 07:40 AM IST
अधिवेशनात शिक्षकांच्या डुलक्या title=

नवी मुंबई : नवी मुंबईत भरलेल्या शिक्षक अधिवेशनात राज्यभरातल्या शिक्षकांनी हजेरी तर लावली. मात्र या अधिवेशन स्थळी शिक्षकांचा भर, चर्चेपेक्षाही अवांतर गोष्टींमध्येच जास्त दिसून आला. 

इथे आलेले बरेचसे शिक्षक मोबाईलमध्ये सेल्फी उतरवण्यातच जास्त रंगून गेलेले दिसत होते. एकमेकांची छबी मोबाईलमध्ये सेल्फीतून बंदिस्त करत, शिक्षकांनी हे अधिवेशन आठवणींत जपण्याला प्राधान्य दिलं. तर इतर शिक्षकांनी शांतपणे डुलकी घेण्याला पसंती देत, स्वतःला बिनदिक्कतपणे निद्रेच्या हवाली केलं. 

अधिवेशनात कोणत्या मुद्यांवर चर्चा सुरु आहे, याच्याशी सोयरसुतक न ठेवता त्यांनी यथेच्छ झोप काढली. तर जागे असलेले इतर शिक्षक विरंगुळा म्हणून निवांतपणे शेंगा खात बसले होते. विशेष म्हणजे एरवी विद्यार्थ्यांना शिस्तीचे धडे देणारे हेच शिक्षक, शेंगा खाऊन त्याची टरफलं मात्र तिथेच आजूबाजूला टाकून खुशाल कचरा करत होते.