जॉनचा १५ दिवस तुरुंगवास कायम!

२००६ मध्ये घडलेल्या हिट अँन्ड रन केसमध्ये जॉन अब्राहमची याचिका सेशन कोर्टांनं फेटाळलीय. या प्रकरणात बांद्र्याच्या कोर्टानं जॉनला 15 दिवसांची कारावासाची शिक्षा सुनावली होती. सध्या जॉन पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्या याचिकेवर पावणेतीन वाजता सुनावणी होणार आहे.

Updated: Mar 9, 2012, 03:45 PM IST

www.24taas.com, मुंबई

२००६ मध्ये घडलेल्या हिट अँन्ड रन केसमध्ये जॉन अब्राहमची फेरयाचिका सेशन कोर्टांनं फेटाळली आहे. त्यामुळे जॉन या प्रकरणी आता हायकोर्टात धाव घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.  या प्रकरणात वांद्र्याच्या कोर्टाने जॉनला 15 दिवसांची कारावासाची शिक्षा सुनावली होती.

 

सध्या जॉन पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याची फेरविचार याचिका फेटाळल्यामुळे जॉनला 15 दिवसांचा कारावास होऊ शकतो. २००६मध्ये जॉनच्या बाईकेने दोघांना उडवलं होतं. त्यात ते जखमी झाले होते.

 

यापूर्वी वांद्याच्या महानगर दंडाधिकाऱ्यांनी जॉनला १५ दिवस कारावासाची शिक्षा सुनावली होती. या विरोधात जॉनने आज याचिका दाखल केले होती. त्यावर सेशन कोर्टाने २०१० चा निकाल कायम ठेवला आणि जॉनला १५ दिवस कारावासाची शिक्षाही कायम ठेवली.

 

सेशन कोर्टाच्या या निकालानंतर जॉनने कोर्टासमोर हजर राहण्यासाठी चार दिवसांची मुदत मागितली होती. यावर आज दुपारी पावणे तीन वाजता सुनावणी झाली. त्यावर यापूर्वीचाच निकाल कायम ठेवण्याचा निर्णय न्यायाधिशांनी घेतला. आता या निर्णयाविरोधात जॉन हायकोर्टात दाद मागणार आहे.

 

संबंधित व्हिडिओ

जॉन अब्राहमला १५ दिवसांची कैद