बिहार दिन तुमच्या राज्यात करा - उद्धव

मुंबईत बिहार दिन साजरा करण्यावरून राज्यातले राजकारण चांगलेच तापले आहे. बिहार दिन महाराष्ट्रात साजरा केला तर महाराष्ट्र दिनही बिहारमध्ये साजरा करावा, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आहे. याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोध केला आहे.

Updated: Apr 12, 2012, 05:31 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

 

मुंबईत बिहार दिन साजरा करण्यावरून राज्यातले राजकारण चांगलेच तापले आहे. बिहार दिन महाराष्ट्रात साजरा केला तर महाराष्ट्र दिनही बिहारमध्ये साजरा करावा, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आहे. याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोध केला आहे.

 

 

 

तसंच भाजपनंही बिहार दिनाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी उद्धव यांनी केलीय. त्यामुळं आता बिहार दिनाबाबत भाजप काय भूमिका घेणार याकंड लक्ष लागल आहे. दरम्यान, बिहार दिनाला विरोध करणा-या राज ठाकरेंना अटक करा, सपाचे आमदार अबू आझमींची मालेगावमध्ये गरळ, राज ठाकरे मालेगावच्या सभेत उत्तर देण्याची शक्यता आहे.

 

 

 

बिहार दिनाला विरोध करणा-या राज ठआकरेंना अटक करा, अशी मागणी समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी केलीय. मालेगावातल्या प्रचारसभेनंतर त्यांनी हे जाहीर विधान केल आहे. बिहार दिनावरुन राजकारण पेटलेलं असताना  मुंबईत बिहार दिन साजरा करण्याच्या नितीशकुमारांच्या आव्हानाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय उत्तर देतात, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. राज ठाकरेंची आज मालेगावमध्ये जाहीर सभा होणारंय. नाशिकची महापालिका काबीज केल्यानंतर मनसेनं आता मालेगावची महापालिकाही ताब्यात घेण्याचा चंग बांधलाय. यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकचे सर्व पदाधिकारी मालेगावात तळ ठोकून आहेत.

 

 

 

शिवसेनेचं नाशिकच्या ग्रामीण भागातलं वर्चस्व उखडून टाकण्यासाठी कार्यकर्ते चांगलेच कामाला लागलेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, अरुण गुजराथी, भाजपचे सुधीर मुनगंटीवार मालेगावात याआधी हजेरी लावून गेलेत. अशी रणधुमाळी सुरू असताना शिवसेनेच्या कुठल्याही नेत्यानं अजूनही मालेगावात हजेरी लावलेली नाही. सेनेची जिल्हा आणि शहर कार्यकारणी अद्याप बरखास्त अवस्थेत असून या सुंदोपसुंदीचा फायदा मनसेलाच अधिक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

व्हिडिओ पाहा..

[jwplayer mediaid="81846"]