राज-उद्धव यांची शेवटची भेट २००८ साली

आज राज आणि उद्धव या ठाकरे बंधूंची भेट तब्बल साडेतीन वर्षांनी झाली. यापूर्वी २००८ साली राज यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती.

Updated: Jul 16, 2012, 06:42 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

आज राज आणि उद्धव या ठाकरे बंधूंची भेट तब्बल साडेतीन वर्षांनी झाली. यापूर्वी २००८ साली राज यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे 'मातोश्री'वर गेले असता बाळासाहेबांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे आणि राज यांची भेट झाली होती.

 

वाढत्या वयामुळे बाळासाहेबांची प्रकृती खालावली होती. अशा प्रसंगी राज ठाकरे आपला राजकीय वाद बाजूला ठेवून आपले राजकीय गुरू आणि दैवताला भेटण्यासाठी राज ठाकरे दुपारी १ च्या सुमारास मातोश्रीवर गेले होते. याचवेळी राज सुरूवातीला उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.

 

त्यानंतर ते दुस-या मजल्यावर असलेल्या बाळासाहेबांच्या रूममध्ये गेले आणि उद्धवच्या उपस्थितीत राजने बाळासाहेबांची भेट घेतली होती. यावेळी राज यांनी बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मात्र तरीही या भेटीतून मनसे आणि शिवसेना एकत्र आले नव्हते. ही भेट केवळ कौटुंबिक स्वरुपाचीच राहिली. ही भेट देखील अडीच वर्षांनी झाली होती. परंतु, मनसेची स्थापना झाल्यानंतर ही पहिली भेट ठरली आहे. ही भेट किती राजकीय हे भेटीअंती समजणार आहे.