अजितदादांची २ टक्के पिछेहाट!

Last Updated: Thursday, March 29, 2012 - 18:16

गॅस दरवाढ ५ टक्क्यांवरून ३ टक्क्यांवर

 


www.24taas.com, मुंबई

बजेटमधील गॅस दरवाढ 2 टक्के मागे घेण्याची घोषणा अजित पवार यांनी विधान परिषदेत केलीय. 2012-13 चे बजेट सादर करताना अर्थमंत्री अजित पवारांनी घरगुती गॅसवर 5 टक्क्यांचा अतिरिक्त कर लावल्यानंतर जनतेत नाराजी पसरली होती.

 

तसंच विरोधकांनीही या दरवाढीवरुन अजित पवारांना टार्गेट केलं होत. विरोधकांबरोबरच काँग्रेसमधील काही मंत्री आणि आमदारांनीही गॅस दरवाढीवरुन नाराजी व्यक्त केली होती.

 

गॅसदरवाढीवरुन सामान्यांचा रोष पत्करणा-या अजित पवारांनी गॅस दरवाढ मागे घेण्याचे संकेत दिले होते. परंतु त्यांनी संपूर्ण दरवाढ मागे न घेता 2 टक्के दरवाढ मागे घेतलीय. त्यामुळं 20 रुपयांऐवजी 12 रुपयांनी गॅस महागणाराय.

 

First Published: Thursday, March 29, 2012 - 18:16
comments powered by Disqus