अजित पवारांची 'ती दोन माणसं गेली कुठे?'

Last Updated: Thursday, June 21, 2012 - 20:44

www.24taas.com, मुंबई

 

मंत्रालयात आग लागली. आणि हा हा म्हणता ती संबंध मंत्रालयभर पसरली... त्यामुळेच एकच हल्लकल्लोळ माजला. आपला जीव मुठीत घेऊन प्रत्येकजण हा धावत होता. मात्र या धावपळीत काही जण कुठेतरी बेपत्ता झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयातील दोन कर्मचारी बेपत्ता झाल्याचं सांगण्यात येतं आहे.

 

उपमुख्यमंत्र्यांचं कार्यालय सहाव्या मजल्यावर आहे. त्यामुळे या दोन जणांची नावं अजून कळू शकलेलं नाही. या दोन व्यक्तींचं काही बरं वाईट झालं नाही ना, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. कारण या आम्हाला काहीही करा आणि वाचवा, धुराचे लोळ पसरलेले आहेत, असे संदेश या लोकांकडून पाठवण्यात येत होते, पण आग वाढल्यानंतर त्यांच्याशी संपर्क तुटला होता.

 

त्यानंतर त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. स्वत: अजित पवार देखील चिंताग्रस्त दिसत होते. सहाव्या माळ्यावर अजुनही अग्निशमन दलाला पोहचणे शक्य झालं नसल्याचं सांगण्यात येतं आहे. अग्निशमन दलाकडून या लोकांचा शोध सुरू आहे.

 

 

 

First Published: Thursday, June 21, 2012 - 20:44
comments powered by Disqus