अण्णा राळेगणसिद्धीकडे रवाना

Last Updated: Thursday, December 29, 2011 - 14:12


झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

तीन दिवस उपोषण करण्याची घोषणा करणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दुसऱ्याच दिवशी आपले उपोषण मागे घेतले. दोन दिवसांच्या उपोषणानंतर आज सकाळी येथून राळेगणसिद्धीकडे रवाना झाले.

 

टीम अण्णा कोअर कमिटीची बैठक लवकरच होणार असल्याचे टीम अण्णाने सांगितले. उपोषणानंतर अण्णांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. दरम्यान, उपोषणापूर्वी तीन दिवस अण्णांनी काही खाल्लेले नव्हते. उपोषणादरम्यान त्यांच्या अंगात ताप भरला होता.

 

गेल्या चार-पाच दिवसांपासून अण्णा हजारे यांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे त्यांना उपोषण सोडण्याचे आवाहन करण्यात आले होते. तसेत काल संसदेत लोकपाल विधेयकावर चर्चा झाली. त्या चर्चेवर अण्णा यांनी नाराजी व्यक्त केली.

 

सरकारची भ्रष्टाचार नष्ट करण्याची इच्छा नाही. बहुमताच्या जोरावर पक्ष एकत्र येऊन हुकुमशाही मार्गाने विधयेक संमत करतात. ही लोकशाही की हुकूमशाही असा सवाल अण्णांनी व्यक्त केला. तसेच दोन आंदोलनापेक्षा काहीसा कमी प्रतिसाद मिळाल्याने अण्णा नाराज दिसले होते. त्यामुळे एक दिवस उपोषण मागे घेतल्याची चर्चा आहे.

 

अण्णांनी दुसऱ्याच दिवशी आपले उपोषण मागे घेतल्यानंतर टीम अण्णांचे सदस्य दिल्लीकडे रवाना झालेत. दरम्यान, पाच राज्यात जाऊन लोकांचे जनजागृती करणार आहेत. ३० डिसेंबर रोजी नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर उपोषण करणार असल्याचेही अण्णांनी स्पष्ट केले आहे.First Published: Thursday, December 29, 2011 - 14:12


comments powered by Disqus