अपहृत संगीता मुंबईत परतली

Last Updated: Thursday, July 12, 2012 - 08:43

www.24taas.com , मुंबई

 

सीएसटी स्टेशनवरून पळवून नेऊन हरिद्वारमध्ये सापडलेल्या परभणीच्या संगीताला रात्री उशीरा मुंबईत आणण्यात आलं.

 

१० जूनला संगीताला सीएसटी स्टेशनवरून पळवून नेण्यात आलं होतं. या घटनेचं सीसीटीव्ही फूटेज प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. राजू या आरोपीनं भीक मागण्यासाठी संगीताचं अपहरण केलं होतं. हरिद्वारच्या बस स्टॅण्डवर  दोन हवालदांनी संगीताला पाहिलं होतं. तिच्यासोबत लंगडत चालणारा एक व्यक्ती होती. सीएसटी स्टेशनवर आरोपी मुलीला घेऊन जात असतानाचं ‘सीसीटीव्ही फुटेज’ प्रसारमाध्यमांनी दाखवल्याने या हवालदारांना संशय आला. त्यांनी राजूला पकडलं. राजूने आपला गुन्हा कबूल केला.

 

संगीताच्या कुटुंबियांनी तक्रार दिल्यावर १०२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून याचा शोध घेण्यात आला होता. तिच्या आई-वडिलांकडे संगीताचा ताबा देण्यात आलाय.

First Published: Thursday, July 12, 2012 - 08:43
comments powered by Disqus