अबू आझमींना २ वर्षं सक्तमजुरी

Last Updated: Tuesday, May 1, 2012 - 09:20

www.24taas.com, मुंबई

 

समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना १२ वर्षांपूर्वी केलेल्या प्रक्षोभक भाषणाबद्दल माझगाव कोर्टानं आज त्यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि ११ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि तत्कालीन शिवसेना नेते नारायण राणे यांच्याविरोधात भाषण करताना अबू आझमींनी २००० साली नागपाड्यात चिथावणीखोर भाषण ठोकलं होतं. हे भाषण प्रक्षोभक असून दंगलींना चिथावणी देणारं आहे, असं माझगाव कोर्टाच्या मॅजिस्ट्रेटनी सांगितलं आहे आणि यासाठी आझमी यांना २ वर्षं सक्तमजुरीची शिक्षाही सुनावली आहे.

 

शिवसेनाप्रमुखांविरोधात भाषण करताना आझमी यांनी विधान केलं होतं की मुस्लिमांच्या रस्त्यात कुणी आडवं आल्यास त्यांना सोडणार नाही. पुन्हा देशाची फाळणी झाली तरी चालेल. 

 

आझमी यांच्यासह वक्रुनिसा अन्सारी, लालबहादूर सिंह, एहसान उला खान आणि अली समशेर यांनाही शिक्षा सुनावण्यात आली आहे. याचबरोबर आझमींना ११ हजार रुपयांचा दंडही ठोठावलाय. मात्र दंडाची रक्कम भरून आझमींनी जामिनावर सुटका करून घेतली आहे. आरोपींना सत्र न्यायालयातही अपील करण्याची मुभा देण्यात आली आहे.

 

First Published: Tuesday, May 1, 2012 - 09:20
comments powered by Disqus