आठवलेंच्या पत्रकार परिषदेत हाणामारी

आरपीआयचे नेते रामदास आठवलेंची पत्रकार परिषद सुरु होण्याआधी आज हाणामारी झाली. काही अज्ञात लोकांनी बाहेर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरें विरोधात घोषणाबाजी केल्यानं वातावरण तापलं.

Updated: Apr 2, 2012, 06:28 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

आरपीआयचे नेते रामदास आठवलेंची पत्रकार परिषद सुरु होण्याआधी आज हाणामारी झाली. काही अज्ञात लोकांनी बाहेर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरें विरोधात घोषणाबाजी केल्यानं वातावरण तापलं. आरपीआयचे कार्यकर्ते मग घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना भिडले आणि दोन्ही गटांत हाणामारी झाली..

 

रामदास आठवलेच्या पत्रकार परिषद हा राडा झाला. आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देणाऱ्या लोकांना बडवलं आहे. मुंबईतील प्रेस क्लबमध्ये आज रामदास आठवले यांची पत्रकार परिषद संपल्यानंतर काही अज्ञात व्यक्तींनी बाळासाहेब यांच्या विरोधात घोषणा दिल्या, तसंच रामदास आठवले झिंदाबाद... अशा घोषणा दिल्या आणि नंतर बाळासाहेब यांच्याविरोधात घोषणा दिल्या.

 

त्यामुळे आरपीआयचे कार्यकर्ते चांगलेच चिडले. त्यांनी या लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर घोषणा देणाऱ्या लोकांना आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी चांगलंच बडवलं. शिवसेना हा आरपीआयचा मित्रपक्ष असल्याने त्यांच्यात वाद निर्माण व्हावा यासाठी असं केल्याचे बोलले जात आहे.