आता सिग्नल तोडला, १५०० रुपये दंड!

Last Updated: Thursday, March 1, 2012 - 20:39


www.24taas.com, मुंबई

 

आता गाडी चालवताना वाहतुकीचे नियम तोडणं तुम्हांला चांगलंच महागात पडणार आहे. केंद्र सरकारनं मोटर व्हेइकल ऍक्टच्या दुरुस्त्यांसाठी मंजुरी दिली आहे.

 

त्यामुळे वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात दंड आकारला जाणार आहे. ड्रायव्हिंग करताना मोबाईवर बोलत असल्यास आता पाचशे रुपये दंड आकारला जाणार आहे. तर मोबाईलवर बोलताना अनेकवेळा पकडलं गेल्यास तब्बल पाच हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.

 

तर सिग्नल तोडणं, सीट बेल्ट न लावणं आणि हेल्मेट न घालणं यासाठी पाचशे ते पंधराशे रुपये दंड आकारला जाणार आहे.

First Published: Thursday, March 1, 2012 - 20:39
comments powered by Disqus