आदर्श घोटाळा : अशोक चव्हाण, फाटकांना अटक?

Last Updated: Wednesday, March 21, 2012 - 09:29

www.24taas.com, मुंबई

 

आदर्श घोटाळाप्रकरणी आता चार जणांना झालेल्या अटकेनंतर आता  माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि काही  तत्कालीन अधिकाऱ्यांना केव्हाही अटक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

 

 

आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने चार जणांना अटक केल्यानंतर आता इतरही दहा आरोपींवर अटकेची टांगती तलवार लटकलीय. इतर दहा आरोपींमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मुंबईचे तत्कालीन आयुक्त जयराज फाटक, रामानंद तिवारी, सुभाष लल्ला, प्रदीप व्यास, रोमेशचंद्र शर्मा, केज कृष्णन कौल, ताराकांत सिन्हा, पी के रामपाल यांना अटक होण्याची शक्यता आहे.

 

आदर्श  घोटाळाप्रकरणी अध्यक्ष वांछू आणि  प्रवर्तक आर. सी. ठाकूर यांच्यासह ४  जणांना सीबीआयने  काल अटक  केली आहे. तर घोटाळ्याप्रकरणी सहा जणांना अटक वॉरंट बजावण्यात आला आहे. त्यामुळे या घोटाळाप्रकरणी आणखी काहींना अटक होण्याची शक्यता होती. यामध्ये दहा जणांचा समावेश होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

 

 

आदर्श घोटाळा प्रकरणी उच्च न्यायालयाने सीबीआयला फटकारलं होते. आरोपींना लवकरात लवकर अटक करा, असे निर्देश न्यायालयाने दिले  होते. सबळ पुरावे असताना आरोपींना अटक का करत नाही, तुम्ही कोणाची वाट पाहत आहता? असा सवालच न्यायालयाने केला होता. त्यामुळे सीबीआयला ही कारवाई करण्यास भाग पाडले आहे. सीबीआयला चांगले फटकारल्याने सीबीआयने कडक कारवाई करण्यासाठी पावले उचललेली दिसून येत आहेत. त्यामुळे यातून अधिकारी आणि माजी मुख्यमंत्री सुटू शकणार नाहीत, अशी चर्चा आहे.

 

 

सीबीआयने बोगस नावाने सोसायटी प्लॅट घेतलेल्या आठ जणांची यादी न्यायालयाला सादर केली. या प्रकरणात सहभागी असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात सबळ पुरावे असल्याची माहिती सीबीआयने न्यायालयाला होती.  दरम्यान कन्नैयालाल गिडवाणी यांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले आहे.  त्यांना लाचप्रकरणात अटक करण्यात आली होती.

 

 

मुंबईतील आदर्श घोटाळा प्रकरणातील आरोपातून मुक्तता करण्यासाठी लाच दिल्याप्रकरणी  माजी आमदार कन्हैयालाल गिडवाणी, त्यांचा मुलगा कैलास आणि दोन वकीलांना सीबीआयने अटक केली होती. आदर्श हौसिंग सोसायटी घोटाळा प्रकरणात अडकलेले गिडवाणी या घोटाळ्यातील प्रमुख संशयित आहेत. आदर्श सोसायटीच्या निर्मितीपासूनच गिडवाणी या सोसायटीचे प्रमुक सदस्य होते.

First Published: Wednesday, March 21, 2012 - 09:29
comments powered by Disqus