आदर्श घोटाळा : विलासराव हाजीर हो...SSS

Last Updated: Wednesday, June 27, 2012 - 12:52

www.24taas.com, मुंबई

 

मुंबईतील आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांची आज पुन्हा साक्ष होणार आहे. त्यासाठी ते चौकशी आयोगासमोर हजर झाले आहेत.

 

एकीकडे भ्रष्टाचाराच्या प्रकरणी केंद्रीय मंत्री वीरभद्र सिंह यांनी राजीनामा दिलेला असताना दुसरीकडं आदर्श सोसायटी घोटाळ्या प्रकरणी चौकशीच्या फे-यात अडकेल्या विलासराव देशमुख यांना मात्र बक्षीस देण्यात आलंय. वीरभद्रसिंह यांच्या लघू व मध्यम उद्योग खात्याचा अतिरिक्त भार विलासरावांकडं सोपवण्यात आला आहे.

 

विलासराव देशमुख केंद्रीय मंत्री झाल्यापासून वेगवेळ्या आरोपांच्या फे-यात अडकलेत. सानंदा प्रकरणावरून कडक ताशेरे ओढल्यानंतर विलासरावांचं प्रमोशन करण्यातत आलं होतं. त्यांच्याकडं ग्रामविकास या महत्वपूर्ण खात्याची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र काही दिवसात त्यांच्याकडून ग्रामविकास खातं काढून घेण्यात आले होते.

 

विविध वादात आणि आरोपात अडकूनही विलासराव मंत्रिमंडळात कायम आहेत. उलट कधी बढती तर कधी अतिरिक्त खात्याचा कारभार त्यांच्याकडं सोपवून त्यांना एकप्रकारे बक्षिसच देण्यात येतंय. दरम्यान आदर्श प्रकरणी आजही त्यांची चौकशी आयोगासमोर साक्ष होणार आहे. कालही त्यांची चौकशी झाली होती.

First Published: Wednesday, June 27, 2012 - 12:52
comments powered by Disqus