उच्च शिक्षण मंत्र्यांचा प्राध्यापकांना इशारा

Last Updated: Wednesday, May 9, 2012 - 20:16

www.24taas.com, मुंबई

 

उत्तरपत्रिका तपासण्यावर बहिष्कार घालणाऱ्या प्राध्यापकांना दोन दिवसांत संप मागे घेऊन कामावर हजर होण्याचं आवाहन सरकारनं केलंय. दोन दिवसांत संप मागे घेतला नाही तर कारवाई करू, असा सज्जड इशारा उच्चशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी दिलाय.

 

सहाव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी प्राध्यापकांनी संप सुरु केलाय. महाराष्ट्रातील दहा विद्यापीठाच्या आणि हजारो महाविद्यालयांमधील सुमारे 38  हजार प्राध्यापकांनी दीर्घकालीन  प्रलंबित मागण्यासाठी संप पुकारला होता. या संपामुळे  विद्यार्थ्याना निकालांना फटका बसण्याची चिन्ह निर्माण झाली होती.

 

सरकारच्या वतीने राज्य सरकार प्राध्यापकांच्या मागण्यावर गांभिर्याने विचार करत असून सहाव्या वेतन आयोगातील 431 कोटी देण्याचे मान्य करण्यात आल्याचे टोपे यानी म्हटलंय. त्याचप्रमाणे फरकाची 1550 कोटी रुपये रक्कम केद्राकडून मिळवून देण्यास आपण प्रयत्नशील असल्याचे सांगत संप मागे घेण्याचा  इशारा टोपे यानी दिलाय.

[jwplayer mediaid="97520"]

First Published: Wednesday, May 9, 2012 - 20:16
comments powered by Disqus