उज्वल निकमांचा चालकाला अटक

Last Updated: Sunday, March 11, 2012 - 23:03

www.24taas.com, मुंबई

 

दोन कुटूंबात झालेल्या वादात मुंबईतल्या कफ परेड परिसरात एका युवकाची भोसकून हत्या करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले असुन धक्कादायक बाब म्हणजे यात विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांच्या पोलिस वाहनचालकाचाही समावेश आहे.

 

पेशानं गाईड असेलेला अमिर कफ परेड परिसरात वास्तव्याला होता. शनिवारी रात्री शेजारी राहणाऱ्या सावडे परिवाराशी अमिरचा काही कारणामुळे वाद झाला. आसपासच्या लोकांनी हस्तक्षेप करत हा वाद मिटवला मात्र रात्री साडे तीनच्या सुमारास काही लोकांनी त्याच्या घरावर हल्ला केला आणि शौचास जाण्यासाठी निघालेल्या आमिरवर धारधार शस्त्रांनी वार करून त्याची हत्या केली

 

अमिरच्या घरच्यांनी सावदे परिवाराने त्याची हत्या केल्याचा आरोप केला आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी अटक केलेल्या चार जणांमध्ये विषेश सरकारी वकील उज्वल निकम यांच्या गाडीचा चालक पोलिस कॉन्सस्टेबल प्रकाश सावदेचाही समावेश आहे. अमिरच्या हत्येने संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी शवविच्छेदनासाठी आमिरचा मृतदेह नेण्यासाठी आलेल्या पोलिसांना घेराव घातला होता.

 

 

 

First Published: Sunday, March 11, 2012 - 23:03
comments powered by Disqus