उद्धव ठाकरेंनी घेतली वडिलांची भेट

शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. लीलावती हॉस्पिटलमध्ये जाऊन उद्धव यांनी बाळासाहेबांची विचारपूस केली.

Updated: Jul 28, 2012, 03:13 PM IST

www.24taas.com, मुंबई

शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. लीलावती हॉस्पिटलमध्ये जाऊन उद्धव यांनी बाळासाहेबांची विचारपूस केली.

बाळासाहेबांची प्रकृती उत्तम असून, येत्या दोन दिवसांमध्ये त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. उद्धव यांच्यावरही गेल्या आठवड्यात अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. त्यानंतर आज उद्धव पहिल्यांदाच बाहेर पडले, त्यांनी लीलावतीमध्ये जाऊन बाळासाहेबांची भेट घेतली.