उद्धव ठाकरे लिलावती रूग्णालयात

शिवसेनेचे कार्याध्‍यक्ष उद्धव ठाकरे यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना आज सकाळी लिलावती रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले आहे.

Updated: Jul 16, 2012, 11:24 AM IST

www.24taas.com, मुंबई

शिवसेनेचे कार्याध्‍यक्ष उद्धव ठाकरे यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना आज सकाळी लिलावती रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले आहे.

उद्धव ठाकरे यांची प्राथमिक तपासणी करण्‍यात आली आहे. या चाचणीनंतर निदान करण्‍यात येईल. नेमका काय त्रास आहे, यासंदर्भात स्‍पष्‍ट माहिती देण्यात आलेली नाही.  परंतु, छातीत दुखू लागल्‍यामुळे त्‍यांना दाखल करण्‍यात आले आहे, असे सांगण्यात आले. उद्धव हे डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत.

उद्धव ठाकरेंना रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आल्‍याचे वृत्त समजताच शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते रुग्‍णालयाबाहेर गोळा झाले आहेत.