उद्या इंदू मिलमध्ये 'रिपाइं'चं आंदोलन

Last Updated: Monday, December 5, 2011 - 03:24

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

दादरमधल्या इंदू मिलच्या जागेवर डॉक्टर आंबेडकरांचं स्मृती स्मारक उभारण्यासाठी जागा द्यावी यासाठी ६ डिसेंबरला रिपब्लिकन सेना आंदोलन करणार आहे. इंदू मिलच्या जागेवर हे आंदोलन केलं जाईल.

 

कित्येक वर्षांपासूनच्या या मागणीकडे सरकार लक्ष देत नसल्यामुळं ६ डिसेंबरला हे आंदोलन करणार असल्याचं रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी सांगितलं. या आंदोलनात लाखो कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.

First Published: Monday, December 5, 2011 - 03:24
comments powered by Disqus