'कृपा'छत्रावर छापे : आबांकडून पोलिसांची पाठराखण

गृहमंत्री आर आर पाटील यांनी पोलिसांची पाठराखण केली आहे. कृपाशंकर सिंह यांच्या घरांवर छापे टाकण्यास पोलिसांनी उशीर केला नाही असं गृहमंत्र्यांनी म्हटलयं. हायकोर्टानं दिलेल्या सुचनांनुसारच कारवाई सुरु असल्याचं आर आर पाटील यांनी म्हटलयं. पोलिसांनी त्यांच्या कर्तव्यात कोणतीही कसूर केली नसल्याचं आर आर पाटील यांनी सांगितलं आहे.

Updated: Mar 2, 2012, 02:20 PM IST

www.24taas.com,मुंबई

 

 

गृहमंत्री आर आर पाटील यांनी पोलिसांची पाठराखण केली आहे. कृपाशंकर सिंह यांच्या घरांवर छापे टाकण्यास पोलिसांनी उशीर केला नाही असं गृहमंत्र्यांनी म्हटलयं. हायकोर्टानं दिलेल्या सुचनांनुसारच कारवाई सुरु असल्याचं आर आर पाटील यांनी म्हटलयं. पोलिसांनी त्यांच्या कर्तव्यात कोणतीही कसूर केली नसल्याचं आर आर पाटील यांनी सांगितलं आहे.

 

 

कृपाशंकर यांच्यावरील कारवाईला जाणिवपूर्वक उशीर झाल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. गुन्हा दाखल झाल्यानंतर कृपांवर तातडीनं कारवाई न करता त्यांना पुरावे नष्ट करण्यासाठी वेळ दिला गेला असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलाय. त्यामुळं मुंबईचे पोलीस आयुक्त आणि काँग्रेस नेत्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. याबाबत आर. आर. पाटील बोलत होते.

 

 

बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी गुन्हे दाखल झालेल्या कृपाशंकर सिंह यांच्या मुंबईतल्या घरांवर छापे पडलेत. कृपाशंकर सिंह यांच्या वांद्र्यातल्या श्रीसाईप्रसाद इमारतीतील घर, वांद्रेतील ऑफिस आणि विलेपार्लेतील ज्युपिटर इमारतीतल्या ड्युप्लेक्स फ्लॅटवर तसच कार्टर रोडवरील तरंग बंगल्यावर छापा टाकण्यात आलाय. तर कृपांचा जावई विजयसिंह यांच्या पवईतल्या घरावरही छापा टाकण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं एकाच वेळी ही कारवाई सुरु केली. कृपाशंकर सिंह यांच्या वांद्र्यातील कार्टर रोडच्या तरंग बंगल्यावरही पोलिसांची कारवाई सुरु आहे, सकाळपासून आर्थिक गुन्हे शाखेची टीम बंगल्यात दाखल झाली आहे.

 

 

पवईतल्या किंग्स्टन इमारतीत दोन फ्लॅटमध्ये ही कारवाई सुरु आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या१५ अधिका-यांची टीम या कारवाईत सहभागी झालीये. किंग्स्टन इमारतीतल्या फ्लॅट क्रमांक ४०१ आणि क्रमांक एक हजास सहा या फ्लॅटवर ही कारवाई सुरु आहे. हे दोन्ही फ्लॅट मीना वैष्णवी आणि दिनेश जकासिया यांच्या नावावर आहेत. मुंबईत एकाच वेळी ८ ते १०ठिकाणी कारवाई सुरु असल्याचं सांगण्यात येतयं. कृपा आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर खरंतर विलंबानं कारवाई सुरु झालीये. मात्र ही कारवाई पोलिसांनी नियोजनपूर्वक सुरु केल्याचं सध्या तरी दिसतयं. आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख राजवर्धन सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई सुरु आहे. त्यांनी साईप्रसाद बिल्डिंगमधील कारवाईची पाहणी केली.

 

 

कृपाशंकर सिंह यांचा जावई विजय सिंह यांच्या पवईतल्या घरावरही छापे टाकण्यात आलेत. पवईतल्या किंगस्टन इमारतीत दोन फ्लॅटमध्ये ही कारवाई सुरु आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या १५ अधिका-यांची टीम या कारवाईत सहभागी झालीये. किंग्स्टन इमारतीतल्या फ्लॅट क्रमांक ४०१ आणि क्रमांक एक हजास सहा या फ्लॅटवर ही कारवाई सुरु आहे. हे दोन्ही फ्लॅट मीना वैष्णवी आणि दिनेश जकासिया यांच्या नावावर आहेत.

 

आणखी संबंधित बातमी

 

कृपाशंकर सिंहांच्या मुंबईतील घरांवर छापे

 

व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा.

 

कृपा’छत्रा’वर छापा