कृपाशंकर पुन्हा अडचणीत

Last Updated: Friday, May 11, 2012 - 15:10

www.24taas.com,मुंबई

 

मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर यांच्याविरोधात ईडीनं तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने ते पुन्हा अडचणीत आले आहेत.

 

कृपांच्या बेहिशोबी मालमत्तेची चौकशी करणा-या ईडीला व्यवहारात अफरातफर आढळून आल्यानं, कृपाशंकर सिंग आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये कृपांची पत्नी मालतीदेवी, मुलगा नरेंद्रकुमार आणि सून अंकिता सिंग यांची चौकशी करण्यात येणार आहे.

 

 

तसंच कृपांचे जावई विजय प्रताप सिंग आणि मुलगी सुनीता सिंग यांचीही चौकशी होणार आहे. त्यामुळे बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी आधीच अडचणीत आलेल्या कृपांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.



First Published: Friday, May 11, 2012 - 15:10


comments powered by Disqus