कृपाशंकर यांचा राजीनामा स्वीकारला!

Last Updated: Wednesday, February 22, 2012 - 19:02

www.24taas.com,मुंबई

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी हायकोर्टानं दिलेल्या झटक्यानंतर, कृपाशंकर सिंह यांच्यावर पक्षश्रेष्ठींचीही अवकृपा झालीय. मुंबई मनपा निवडणुकीनंतर मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा दिलेला पक्षश्रेष्ठींनी स्वीकारला आहे. यामुळे कृपाशंकर सिंह यांना आज दुहेरी फटका बसलाय.

 

कृपाशंकर सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आणि त्यांची स्थावर मालमत्ता जप्त करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं आज दिलेत. त्यानंतर लगेचच कृपांनी निवडणुकांच्या निकालानंतर दिलेला राजीनामा पक्षश्रेष्ठींनी स्वीकारल्याचं वृत्त आलं.

 

मुख्यमंत्र्यांनीही नाशिकमध्ये कृपांनी राजीनामा दिल्याचं सांगत, या वृत्ताला दुजोरा दिलाय. त्यानंतर प्रदेश काँग्रेसचे प्रभारी मोहनप्रकाश यांनीही कृपाशंकर सिंह यांचा राजीनामा स्वीकारल्याची अधिकृत घोषणा केली. एकूणच मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर अडचणीत आलेल्या कृपाशंकर सिंह यांना हे बेहिशेबी मालमत्ता प्रकरण चांगलंच भोवलय. पक्षश्रेष्ठींनाही कृपांविरोधात कारवा करण्याची आयती संधीच या निमित्तानं चालून आली.

 

कृपाशंकर सिहांवर कारवाई होणार - माणिकराव

कृपाशंकर सिंहांवरच्या कारवाईचा निर्णय हायकमांडच घेणार असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी दिलीय. कोर्टाच्या निर्णयासंदर्भातला अहवाल हायकमांडकडे पाठवणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यांच्या निर्णयानुसार पुढील कारवाई करण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलंय.

 

कोर्टाच्या आदेशाची प्रत पाहून प्रतिक्रिया – कृपाशंकर सिंह

तर कोर्टाच्या आदेशाची प्रत मिळालेली नाही, प्रत पाहूनच प्रतिक्रिया देईन अशी सावध भूमिका कृपाशंकर यांनी घेतलीय.

 

अक्कलनंतर आता भांडवलही गेलं - शिवसेना

या प्रकरणावरुन शिवसेनेनंही कृपाशंकर यांच्यावर टीका केलीय. महापालिका निवडणुकीच्या वेळी कृपांची अक्कल गेली होती आता भांडवल गेलं..निवडणुकीच्या काळात आम्ही सातत्यानं आवाज उठवला आता कोर्टानं त्यांच्या संपत्ती जप्तीचे आदेश दिले हे चांगलं झालं अशी प्रतिक्रिया शिवसेनेनं दिलीय.

 

कृपाशंकर सिंहांची बेहिशेबी मालमत्ता

  • - कृपाशंकर आणि त्यांच्या कुटुंबीयांचे एकत्रित उत्पन्न 69 लाख 94 हजार 258 रुपये
  • - कृपाशंकर यांचे 18 बँकांमध्ये 100 कोटीपर्यंत व्यवहार
  • - 16 वर्षांत कृपाशंकर सिंहांच्या उत्पन्नात अचानक आणि अचाट वाढ
  • - 2009 मध्ये कृपाशंकर सिंह यांचा मुलगा नरेंद्रमोहन सिंह याला डी.बी. रियाल्टीकडून साडे चार कोटी मिळाले
  • - शाहीद बल्वाच्या कंपनीनं तीन हप्त्यांमध्ये हे पैसे नरेंद्रमोहन सिंह याच्या खात्यात जमा केले
  • - झारखंडचे खाण घोटाळा फेम मुख्यमंत्री मधु कोडा यांचे सहकारी कमलेश सिंह यांच्या मुलीबरोबर नरेंद्रमोहन सिंहांचे लग्न
  • - नरेंद्रमोहनच्या लग्नासाठी सिंह कुटुंबीयांचं व-हाड नऊ विमानांनी रांचीला गेलं
  • - मधु कोडांनी केलेल्या घोटाळ्याशीही कृपाशंकर यांचा संबंध असल्याचा आरोप
[jwplayer mediaid="53492"]
[jwplayer mediaid="53439"]
First Published: Wednesday, February 22, 2012 - 19:02
comments powered by Disqus