कॅग अहवाल : मंत्रिमंडळ बैठकीत गदारोळ

Last Updated: Thursday, April 12, 2012 - 18:21

www.24taas.com, मुंबई

 

 

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत कॅगच्या अहवालावरुन गदारोळ झाला. कॅगचा अहवाल स्वीकारण्यास काही मंत्र्यांनी विरोध करत हा अहवाल राज्य सरकारनं फेटाळण्याची मागणी केली. मात्र यासंदर्भातील निर्णय आजच्या बैठकीत होऊ शकला नसला तरी. राज्याचे एडव्होकेट जनरल यांच्याकडं यावर मत मागवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

 

उद्या पुन्हा मंत्रिमंडळ बैठक होणार असून यामध्ये एडव्होकेट जनरल यांच्याकडून आलेल्या मतावर चर्चा करुन निर्णय घेण्यात येणाराय. कॅगचा अहवाल सभागृहात मांडण्याअगोदरच कसा फुटला. यावरुन काही मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न केल्याचं सांगण्यात येत आहे. कॅगच्या अहवालावर आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. यावेळी सर्वच मंत्र्यांनी कॅगच्या अहवालावर तीव्र टीका केली.

 

 

अहवाल सादर करण्यापूर्वी फुटला कसा, अहवाल पूर्वग्रह दूषित आहे असे आरोप यावेळी ठेवण्यात आले. त्यामुळे मंत्रिमंडळाने अहवाल न स्वीकारता तो फेटाळून लावण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात राज्य सरकार उद्या महाधिवक्‍त्यांचा सल्ला घेणार आहे. कॅगच्या अहवालावर उद्या पुन्हा मंत्रिमंडळाची बैठक बोलविण्यात आली आहे.
नुकत्याच सादर करण्यात आलेल्या कॅगच्या अहवालात १० मंत्र्यांवर ठपका ठेवण्यात आला आहे. मंत्र्यांच्या मालकीच्या असलेल्या किंवा त्यांच्या नातलगांकडून चालविण्यात येत असलेल्या संस्थांमुळे राज्याला कोट्यवधी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले असल्याचे अहवालात म्हटले आहे.

First Published: Thursday, April 12, 2012 - 18:21
comments powered by Disqus