खिशावर एसटीचा डल्ला

Last Updated: Sunday, August 5, 2012 - 15:02

www.24taas.com,  मुंबई

 

एसटीला दररोज लाखो रूपयांचा तोटा होत असल्याचे कारण पुढे करून  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सामान्यांच्या खिशावर एसटी पुन्हा डल्ला मारणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही भाडेवाढ ४ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. ही भाडेवाढ  ६.२५ टक्के इतकी असणार आहे.

 

डिझेलच्या नुकत्याच दरवाढीने सर्वसामान्यांच्या खिशाला आधीच कात्री लागली आहे.  डिझेल दरवाढिमुळे एसटीला दररोज १५ लाख रुपयांचे नुकसान सोसावे लागत असल्याने ही दरवाढ करण्यात आल्याचे एसटीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी सांगितले.

 

एसटीने प्रवास करणा-यापैंकी ग्रामीण भागातील लोकांचे प्रमाण सर्वाधीक आहे.या दरवाढीची झळ त्यांना बसू नये,यासाठी साध्या गाडीच्या पहिल्या सहा किमीसाठी दरवाढ नाही.त्यानंतरच्या प्रत्येक टप्यासाठी ३० पैसे तर प्रतिकिमी ५ पैशाची दरवाढ केली आहे.तसेच १० ते १२ किमीसाठी दरवाढ नसून,१३ ते २७ किमीसाठी एक रुपया, २८ ते ४२ किमीसाठी दोनरुपये अशी दरवाढ करण्यात अली आहे.

 

मुंबई-पुणे,ठाणे-पुणे अशी वातानकुलीत शिवनेरी गाडीचे सध्याचे भाडे ३२० रूपये असुन नवीन भाडे ३४० होणार आहे. रात्रसेवा,निमआराम (शीतल) आणि वातानुकूलित (शिवनेरी) गाड्यांच्या भाड्यात टप्पानिहाय वाढ करण्यात आली असल्याची माहिती दीपक कपूर यांनी दिली.First Published: Sunday, August 5, 2012 - 15:02


comments powered by Disqus