ठणठणीत बाळासाहेब मातोश्रीवर

Last Updated: Wednesday, August 1, 2012 - 20:24

www.24taas.com, मुंबई

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना लिलावतीतून डिस्चार्ज मिळालाय. बाळासाहेबांची प्रकृती उत्तम आहे. श्वसनाचा त्रास झाल्यानं २४ जुलैपासून बाळासाहेबांना मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आलं होतं. तब्बल नऊ दिवस बाळासाहेब हॉस्पिटलमध्ये होते.

 

बाळासाहेबांवर एण्डोस्कोपी करण्याची गरज नसल्याचं आज सकाळीच लीलावतीच्या हॉस्पिटलकडून हे स्पष्ट करण्यात आलं होतं. बाळासाहेबांची प्रकृती ठणठणीट आहे. बाळासाहेबांवर हैदाराबादच्या डॉक्टर नागेश्वर रेड्डी य़ांच्याकडून एण्डोस्कोपी करण्यात येणार होती. त्यासाठी डॉक्टर मुंबईतही आले होते.  एण्डोस्कोपी  करण्याची सगळी तयारी पूर्ण झाली असताना बाळासाहेबांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी एण्डोस्कोपीची गरज नसून बाळासाहेब ठणठणीत असल्याचं सांगितलं.

 

दरम्यान, बाळासाहेब घरी परतल्यामुळे तमाम शिवसैनिकांना आनंद झाला आहे. बाळासाहेब सुखरूप घरी परतावेत यासाठी शिवसैनिकांनी देवही पाण्यात ठेवले होते. आज ठिकठिकाणाहून बाळासाहेबांवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.

 

.

First Published: Wednesday, August 1, 2012 - 20:24
comments powered by Disqus