धडामधुमबाबत सावधान, अन्यथा जेल

दिवाळीत मोठ्या आवाजाचे फटाके फोडणाऱ्याला १२५० रुपये दंड भरावा लागेल. त्याशिवाय आठ दिवस कोठडीत जावे लागेल.

Updated: Oct 25, 2011, 02:30 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई 

 

दिवाळीच्या काळातील ध्वनिप्रदुषणावर यंदा मुंबई पोलिसांची करडी नजर असेल. रात्री १० वाजल्यानंतर मोठ्या आवाजाचे फटाके फोडणाऱ्याला १२५० रुपये दंड भरावा लागेल. त्याशिवाय आठ दिवस कोठडीत जावे लागेल.

 

याबाबतचा प्रतिबंधात्मक आदेश मुंबई पोलिसांनी नुकताच जारी केला आहे. १८ नोव्हेंबरपर्यंत रात्री १० वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत फटाके फोडण्यावर ही बंदी मुंबई पोलिसांनी घातली आहे.