धावत्या ट्रेनमधील दोघे गंभीर जखमी

Last Updated: Saturday, April 21, 2012 - 10:50

www.24taas.com, मुंबई

 

मुंबईत धावत्या ट्रेनच्या दारात उभ्या असलेल्या दोन तरुणांची एकमेकांना धडक बसली आणि यात दोघेजण गंभीर जखमी झालेत. दौलत शिवसुंदर आणि सागर भोर, अशी या तरुणांची नावे आहेत.

 

दौलतचं लग्न येत्या तीन मे ला होणार आहे. त्यासाठी लग्नाचा सूट खरेदी करून परतत असताना हा अपघात झाला. तर सागर हा बारावीचा विद्यार्थी आहे. या दोघांनाही भांडुपच्या फॉर्च्यून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.. मात्र पैसे नसल्याने उपचार करण्यास डॉक्टरांनी नकार दिल्याचं जखमींच्या नातेवाईकांनी सांगितले. यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

 

 

व्हिडिओ पाहा...

 

[jwplayer mediaid="86896"]

First Published: Saturday, April 21, 2012 - 10:50
comments powered by Disqus