धुराचाही येतोय वास...

Last Updated: Thursday, June 21, 2012 - 17:02

www.24taas.com, मुंबई

 

मंत्रालय म्हणून ओळखलं जाणारं महाराष्ट्र सराकारचं मुख्यालय आगीच्या आज एका भीषण आगीच्या भक्ष्यस्थानी पडलंय. त्यामुळे कशी लागली हा सगळ्यांनाच पडलेला प्रश्न...

 

प्राथमिक सुत्रांच्या माहितीनुसार ही आग शॉर्च सर्किटमुळे लागल्याचं समजतंय. कोणत्याही आगीसाठी हे प्राथमिक कारण समजलं जातं.

 

पण, या आगीचं आणखीही एक कारण सांगितलं जातंय. अजाणतेपणी खाली टाकलेल्या पेटत्या सिगारेटनं हा सगळा खेळ-खंडोबा केल्याची  शक्यता वर्तवण्यात येतेय.

 

पण काहींना या धुरातही काहीतरी शिजल्याचा वास येतोय. कारण, सरकारी कामकाज सुरू असलेल्या या इमारतीत आग विझवण्याच्या सुरक्षा आणि साहित्य असूनही या आगीनं एवढं तीव्र रुप धारण केलंच कसं. असा प्रश्न ही घटना पाहणाऱ्या तसंच घटनास्थळी उपस्थित असलेल्या सगळ्यांनाच पडलाय. या इमारतीत आदर्श घोटाळ्याशी संबंधित आणि अशाच इतर महत्त्वाच्या फाइल्स होत्या, हे विशेष.

 

First Published: Thursday, June 21, 2012 - 17:02
comments powered by Disqus