नवाब सैफ अली खानला केले पोलिसांनी अटक !

Last Updated: Wednesday, February 22, 2012 - 21:14

www.24taas.com, मुंबई

 

अभिनेता सैफ अली खानला कुलाबा पोलिसांनी अटक करण्यात आली आहे.   अनिवासी भारतीय आणि साऊथ अफ्रिकेतील उच्चपदस्थ अधिकारी इकबाल शर्माला मारहाण केल्याप्रकरणी सैफ अली खान याच्या विरोधात कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सैफ अली खान याच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करण्यासाठी त्याचे घर गाठले. परंतु, तो त्या ठिकाणी उपस्थित नव्हता. त्यानंतर पोलीस त्याच्या शोधात होते. सैफ अली खान याने स्वतः मोबाईलही स्विच ऑफ केला होता.  सैफ पोलिसांसमोर हजर होणार असे वृत्त होते. परंतु, पोलिसांनी त्याला मरिन लाइन्स पोलिस ठाण्याजवळ ताब्यात घेतले. तेथून त्याला कुलाबा येथील ठाण्यात घेऊन गेले.

सैफला तांत्रिक अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले.

 

सैफ अली खान याने ताज हॉटेल मधील वासवी रेस्टॉरंटमध्ये इक्बाल शर्मा याला मारहाण केली होती.  सैफ अली खान आणि त्याचे मित्र रेस्टॉरंटमध्ये गेले होते. त्यावेळी सैफ अली खान आणि मित्रांनी मोठमोठ्यांनी गोंधळ घालायला सुरूवात केली. त्यावर शेजारच्या टेबलवर असलेल्या इक्बाल शर्मा यांनी सैफ यांना आवाज कमी करण्याची विनंती केली. परंतु, त्यानंतर झालेल्या बाचाबाजी होऊन मारहाण झाली. या मारहाणीत इक्बाल शर्मा यांच्या नाकाला इजा झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

ही मारहाण झाली तेव्हा सैफ अली खान सोबत बेबो म्हणजेच करीना कपूर देखील हजर होती. सैफ अली खान यांच्याविरोधात इक्बाल यांनी तक्रार नोंदवली. त्यामुळे पोलिसांनी हा गुन्हा नोंदवून घेतला आहे.

 

तसचं सुत्रांकडून समजते की, पोलिसांनी ही तक्रार ३२५ या कलमा अतंर्गत नोंदवल्यामुळे सैफ अली खानला अटक देखील होण्याची शक्यता आहे. तसचं खात्रीलायक सुत्रांकडून असेही समजते आहे की, पोलिसांची एक टीम सैफ अलीची चौकशी करण्यासाठी त्याच्या निवासस्थानी दाखल झाली मात्र त्यावेळी सैफ अली खान उपस्थित नव्हता. या ठिकाणी करीना कपूर उपस्थित होती.  आता पोलीस सैफच्या मागावर आहेत.  ३२५ हे  कलम अजामीनपात्र असल्याने सैफला अटक केली जाऊ शकते.

 

 

कसा घडला प्रकार

अनिवासी भारतीय आणि साऊथ अफ्रिकेतील उच्चपदस्थ अधिकारी इकबाल शर्माला मारहाण केल्याप्रकरणी सैफ अली खान चांगलाच अडचणीत आलाय.

 

कुलाब्याच्या ताज हॉटेलमध्ये सैफ अली खान मित्रांसोबत जेवण्यासाठी गेला होता. यावेळी सैफची गर्लफ्रेंड करिना कपूर आणि करिश्मा कपूरही त्याच्यासोबत असल्याची माहिती आहे. सैफच्या शेजारच्या टेबलावर साऊथ अफ्रिका ट्रेड अँड इन्व्हेन्स्टमेंटचा डेप्युरी डिरेक्टर जनरल इकबाल शर्मा बसला होता. मोठ्या आवाजात चर्चा करणा-या सैफला त्याने आवाज कमी करायला सांगितले.

 

यामुळं चिडलेल्या सैफनं शांतता हवी असेल, तर लायब्ररीत जाण्याचा सल्ला इकबालला दिला. त्यानंतर सैफने चायनीज बॉल इकबालच्या चेह-यावर फेकून मारला. त्यानंतर सैफने इकबालच्या चेह-यावर गुद्दा मारला. यात इकबालच्या नाकाचे हाड मोडले आणि तो जखमी झाला. पहाटे चार वाजता हा प्रसंग घडला. हा सर्व प्रसंग हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला. इकबालने सैफविरुद्ध कुलाबा पोलिसांत तक्रार दाखल केली. कुलाबा पोलिसांनी सैफला पोलीस स्टेशनमध्ये हजर होण्यास सांगितलं.

 

2008 मध्ये छायचित्रकारालाही मारहाणीचं प्रकरणी गुन्हा

2008 मध्ये पटियालात एका छायाचित्रकाराला मारहाण केल्याप्रकरणी सैफवर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी सैफनं माफी मागितल्यानंतर प्रकरण मिटलं होतं. चिंकारा शिकार प्रकरणामध्येही सैफ खान अडचणीत आला होता.सैफवर आता दाखल झालेला गुन्हा हा अजामीनपात्र आहे. या गुन्ह्यासाठी सैफला 7 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा होऊ शकते.

 

[jwplayer mediaid="53461"]

 

 

First Published: Wednesday, February 22, 2012 - 21:14
comments powered by Disqus