नामदेव ढसाळांचा इशारा

Last Updated: Monday, January 9, 2012 - 15:20

www.24taas.com, मुंबई

 

शिवसेना, भाजप आणि रिपाई यांच्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी जागावाटपावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर रिपाईच्या वाट्याला आलेल्या जागांबाबत वादाला तोंड फूटलं आहे. नामदेव ढसाळ यांनी आमच्या रामदास आठवले यांना आमच्या जागांबाबत ११ तारखेपर्यंत निर्णय घ्या असा निर्वाणीचा इशारा दिला. महायुतीत रिपाईच्या वाट्याला २९ जागा आल्या आहेत. आता रिपाईच्या कोट्यातील जागांमध्ये ढसाळांनी आमच्या वाटणीला किती जागा येणार आहे ते स्पष्ट करावं अशी भूमिका घेतली आहे. नामदेव ढसाळ यांनी झी २४ तासशी बोलताना सांगितलं कि आमच्या वाटणीला जागा आल्या नाहीत तर वेगळा विचार करावा लागेल.

 

 

 

 

 

 

 

[jwplayer mediaid="26121"]First Published: Monday, January 9, 2012 - 15:20


comments powered by Disqus
Live Streaming of Lalbaugcha Raja