पोलिसांच्या कचाट्यातून खुनी पालांडे फरार

Last Updated: Wednesday, April 11, 2012 - 07:43

www.24taas.com, मुंबई

 

ओशिवरा अरुण टिक्कू हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी फरार झाला आहे. विजय पालांडे असं या आरोपीचं नाव असून, क्राईम ब्रांचच्या पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला आहे. या प्रकरणी ३ आरोपींना पोलिसांनी अटक केली होती.

 

ओशिवरातले जेष्ठ नागरिक अरूण टिक्कू  हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी अखेर गजाआड झाले होते. कोट्यावधी किंमतीचे फ्लॅट मिळवण्यासाठी आरोपींनी टिक्कू यांची हत्या केली होती. क्राइम ब्रांचने ३ आरोपींना कऱ्हाड आणि मुंबईतून अटक केले होते.

 

७ एप्रिल २०१२ला मुंबईच्या ओशीवारा परिसरात अरूण टिक्कू या जेष्ठ नागरिकाची निर्घूण हत्या करण्यात आली होती. तब्बल तीन दिवसांचा तपासानंतर मुंबई पोलिसांना या हत्येचा छडा लावण्यात यश आलं होतं. पोलिसांनी या प्रकरणी विजय पलांडे, धनंजय शिंदे आणि मनोज गजकोष या तिघांना अटक केली होती. त्यात विजय पलांडे हा पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.

 

अरूण टिक्कू यांचे ओशिवराऱ्यातील ३ फ्लॅट्स बळकवण्यासाठी आरोपींनी त्यांचा खून केल्याच प्राथमिक तपासात स्पष्ट झालं होतं. एका जर्मन महिलेचा मदतीने आरोपी विजय पलांडे यांनी मयत अरूण टिक्कू यांचे फ्लॅट भाड्यावर घेतले होते. काही महिन्यानंतर  आरोपी हे अंडरवर्ल्डसाठी काम करत असल्यानं समजल्यानंतर अरूण टिक्कूंनी विजय पलांडे आणि त्याचा साथीदारांना फ्लॅटमधून बाहेर काढून टाकलं होता. मोक्याच्या ठिकाणी असलेला फ्लॅट हातातून निघून जाणार ह्या भितीमुळे आरोपींनी टिक्कू यांची हत्या केली होती.

 

 

 

First Published: Wednesday, April 11, 2012 - 07:43
comments powered by Disqus