पोलीस खबऱ्याचा मारेकरी जग्या नेपाळी गजाआड

मुंबईतल्या वडाळा भागातील पोलीस खबऱ्याच्या हत्याप्रकरणाचा उलगडा झालाय. पोलीस-खबरी नासीर शेख उर्फ नासीर दाढीची हत्या करणारा कुख्यात गुंड जग्या नेपाळीला मुंबई क्राइम ब्रान्चनं अटक केलीय.

Updated: Jun 16, 2012, 09:02 AM IST

www.24taas.com, दिनेश मौर्या, मुंबई 

 

मुंबईतल्या वडाळा भागातील पोलीस खबऱ्याच्या हत्याप्रकरणाचा उलगडा झालाय. पोलीस-खबरी नासीर शेख उर्फ  नासीर दाढीची हत्या करणारा कुख्यात गुंड जग्या नेपाळीला मुंबई क्राइम ब्रान्चनं अटक केलीय.

 

नासीर शेख उर्फ नासीर दाढी... मुंबई पोलिसांच्या या खबऱ्याची १२ तारखेला  निर्घृण हत्या करण्यात आली होती. पोलीस खबऱ्याची अशा प्रकारे हत्या झाल्यानं एकच खळबळ उडाली होती. नासीरनं पुरवलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कित्येक गुंडांना गजाआड केलं होतं. त्यामुळं मुंबई क्राईम ब्रान्चनं या प्रकरणाची गंभीर दखल घेत वेगात तपास सुरू केला आणि तीन आरोपींना अटक केली. यातला मुख्य आरोपी जग्या नेपाळी आणि नासीर दाढीमध्ये वैर असल्याचं  पोलीस तपासात समोर आलंय.

 

जग्या नेपाळीचा भाऊ शेरप्या नेपाळी याचा २००६ मध्ये पोलिसांनी एन्काऊंटर केला होता. नासीर शेखनं शेरप्याची माहिती पोलिसांना पुरवल्याचा संशय जग्या नेपाळीला होता. या एन्काऊंटरचा सूड घेण्यासाठीच ही हत्या घडवून आणल्याचा संशय पोलिसांना आहे. नासीर शेख हा दाउदच्या टोळीसाठी काम करत असल्यानं  त्याचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी होती.

 

कशी झाली होती हत्या : व्हिडिओ पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

http://zeenews.india.com/marathi/?p=119695

 

.