फॅन्सी बारवर छापा

Last Updated: Thursday, December 8, 2011 - 10:39

झी २४ तास वेब टीम, मुंबई

मुंबईत समाज सेवा शाखेनं फॅन्सी बारवर छापा मारला. यावेळी तिथं काम करणा-या सात मुली, हॉटेलचा मॅनेजर आणि बारा लोकांना अटक करण्यात आली. तसंच लाखो रूपये जप्तही करण्यात आले. पोलिसांना बार मधल्या सिंगर वेश्या व्यवसाय करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर हा छापा टाकण्यात आला.

 

या बारच्या खाली तळघर असल्याचं लक्षात आलं होतं. या तळघरात वेश्या व्यवसाय चालू असल्याचे आढळून आले. हा प्रकार लक्षात येताच पोलिांनी धाड टाकून तुथे काम करणाऱ्या मुली, मॅनेजर  अटक केलं.

 

मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी डान्स बारच्या आडून शरीरविक्रयाची कामं होत असल्याच्या घटना बऱ्याच वेळा समोर आल्या आहेत. पोलिसांना खरंतर बऱ्याचवेळा आपल्या परिसरात चालणाऱ्या गैरधंद्यांची माहिती असते, पण त्यासंदर्भात कारवाई कधीतरीच होते. काही प्रसंगी तर या सर्व प्रकारांत पोलिसांचाही सहभाग असल्याचं दृष्टीस आलेलं आहे.  गेल्याच आठवड्यात दादर येथील बेवॉच या बारवरही धाड टाकण्यात आली होती.

 

First Published: Thursday, December 8, 2011 - 10:39
comments powered by Disqus