बारावीचा निकाल २५ मे रोजी

Last Updated: Wednesday, May 23, 2012 - 12:36

www.24taas.com, मुंबई

 

बारावीच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. हा निकाल २५ मे रोजी लागणार आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर दुपारी 1 वाजल्यानंतर हा निकाल पाहायला मिळेल.

 

दहावी - बारावीचा निकाल कधी लागणार याबद्दल विद्यार्थ्यांना आणि पालकांना उत्सुकता होती. दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल यंदा गतवर्षीपेक्षा किमान चार दिवस अगोदर जाहीर केला जाईल, असं शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी नुकतंच जाहीर केलं होतं. प्राध्यापकांचा संपामुळे निकाल उशीरा जाहीर होईल, असं वाटत असतानाच या बातमीनं विद्यार्थ्यांना दिलासा दिलाय.First Published: Wednesday, May 23, 2012 - 12:36


comments powered by Disqus