बाळासाहेबांवर उद्या एण्डोस्कोपी

Last Updated: Tuesday, July 31, 2012 - 09:45

www.24taas.com, मुंबई

 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर उद्या एणडोस्कोपी केली जाणार आहे. शिवसेना वर्तुळातल्या सुत्रांच्या माहितीनुसार हैदराबादचे निष्णात डॉक्टर नागेश्वर रेड्डी यांची टीम ही शस्त्रक्रिया करणार आहे.

 

या सगळ्य़ा प्रक्रियेत लीलावतीचे डॉक्टर शरद शहा आणि अनिरुद्ध फडके हेही सहभागी होणार आहेत. बाळासाहेबांची सध्या प्रकृती स्थिर आहे. बाळासाहेबांना सध्या लीलावती हॉस्पिटलच्या अकराव्या माळ्यावरील विशेष कक्षात ठेवण्यात आलं आहे. २४ जुलैपासून बाळासाहेबांवर लीलावतीत उपचार सुरु आहेत. वैद्यकीय अधिका-यांचं एक विशेष पथक बाळासाहेबांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.

 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना प्रकृती अस्वस्थतेच्या कारणावरून लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. मे महिन्यातही श्वसनाचा त्रास जाणवल्यानं बाळासाहेबांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. दोन दिवस ते हॉस्पिटलमध्ये होते. वेगवेगळ्या चाचण्या केल्यानंतर आणि प्रकृती थोडी स्थिर झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.

 First Published: Tuesday, July 31, 2012 - 09:45


comments powered by Disqus