बेस्टच्या सीएनजी व्होल्वो वादात...

बेस्टनं सीएनजी व्होल्वो बस सुरू केलीयं. बेस्टन चार वर्षापूर्वी २७० किंगलॉन बस १६ कोटी २० लाख विकत घेतल्या. मात्र, गेल्यावर्षी यातील शंभर किंगलॉन बस भर पावसात बंद पडल्या. त्यामुळं सीएनजी व्होल्वोला विरोध होतोय.

Updated: Jul 3, 2012, 11:07 PM IST

www.24taas.com, मुंबई 

बेस्टनं  सीएनजी व्होल्वो बस सुरू केलीयं. बेस्टन चार वर्षापूर्वी २७० किंगलॉन बस १६ कोटी २० लाख विकत घेतल्या. मात्र, गेल्यावर्षी यातील शंभर किंगलॉन बस भर पावसात बंद पडल्या. त्यामुळं सीएनजी व्होल्वोला विरोध होतोय.

बेस्टनं सीएनजी व्होल्वो बस प्रायोगिक तत्वावर सुरू केलीयं. मात्र ही सेवा वादाच्या भोवऱ्यात सापडलीयं. चार वर्षांपूर्वी २७० किंगलॉन बस १६ कोटी २० लाख विकत घेतल्या. मात्र गेल्यावर्षी यातील शंभर किंगलॉन बस भर पावसात बंद पडल्या.त्यामुळे सीएनजी व्होलव्हो पावसात मुंबईकराना कशी सेवा देईल असा सवाल विरोधकांनी केलाय.

विरोधकांच्या आरोपाचं सत्ताधाऱ्यांनी खंडन केलय. किंगलॉन बस सुरू करताना बेस्टला अनुभव नव्हता, असं सांगत ही सीएनजी व्होलव्हो बस अत्याधुनिक असल्यामुळे पावसात बंद पडणार नाही असा दावा बेस्टच्या चेअरमननी केलायं.

बेस्टच्या ४७०० बसेस रोज  मुंबईच्या रस्त्यावर धावतात. यात २७० किंगलॉन बसमधील शंभर बसेस गेल्यावर्षी पावसात नादुरूस्त झाल्यानं. डेपोत अडगळीत  आहेत. नव्या बस कार्यक्षमतेनं चालाव्यात अशी अपेक्षा आहे.