भगवती हॉस्पिटलला 'मनसे'चा इशारा

Last Updated: Wednesday, May 9, 2012 - 00:00

www.24taas.com, मुंबई

 

मुंबई उपनगरातील बोरिवलीतल्या महानगरपालिकेच्या भगवती हॉस्पिटलवर मनसेनं मोर्चा नेऊन वैद्यकिय अधिका-यांना घेराव घालून मनसे स्टाईलनं निवेदन दिलं.

 

इथल्या सर्जिकल विभागात एकही डॉक्टर नसल्यामुळं गेल्या दोन महिन्यांत  हॉस्पिटलमध्ये एकही ऑपरेशन झालेलं नाही. हॉस्पीटलच्या इमारतींना टेकू लावण्याची वेळ आलीय. लिफ्ट गेले काही दिवस बंद आहे. मात्र वैद्यकिय अधिका-यांकडं यावर ठोस उत्तर नाही...

 

त्यामुळं मनसे आमदार प्रविण दरेकर यांनी हॉस्पीटलमध्ये कार्यकर्त्यांसह घुसून वैद्यकिय अधिका-यांना घेराव घालून एका आठवड्यात  सर्जिकल विभागात डॉक्टर नेमण्यात यावा अथवा मनसे स्टाईलनं दणका देण्याचा इशारा देण्यात आलाय.

 

First Published: Wednesday, May 9, 2012 - 00:00
comments powered by Disqus