भुजबळांच्या एमईटीची चौकशी सुरु

Last Updated: Saturday, April 7, 2012 - 18:28

www.24taas.com, मुंबई

 

 

भुजबळांच्या मुंबई एज्युकेशन ट्रस्ट म्हणजेच एमईटीची आज चौकशी सुरु झाली. धर्मादाय आयुक्तांच्या आदेशानुसार आज सहाय्यक धर्मादाय आयुक्त मंगेश देशपांडे एमईटीची पाहणी केली. या चौकशीचं व्हिडिओ शुटींगही करण्यात आले आहे. त्यामुळे या चौकशीत काय फलित हाताला सापडतं की केवळ चौकशीचा फार्स, याचीच उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

 

 

एमईटीचा अशैक्षणिक आणि व्यापारी उद्देशासाठी वापर होत असल्याचा आरोप संस्थेचे संस्थापक विश्वस्त सुनील कर्वे यांनी केला होता. शिवाय या गैरव्यवहारांची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आज ही पाहणी सुरु करण्यात आली आहे. दरम्यान संस्थेचे संस्थापक-विश्वस्त सुनील कर्वेंना मात्र एमईटीमध्ये प्रवेश नाकारला. फिर्यादीचा प्रतिनिधी आत जावू शकतो मात्र फिर्यादी नसल्याचं कारण देत भुजबळांच्या वकिलांनी कर्वेंच्या प्रवेशास आक्षेप घेतला. याबाबत कर्वेंनी नाराजी व्यक्त केली.

 

 

भुजबळ घाबरले असून त्यामुळेच त्यांनी परवानगी नाकारली असल्याची प्रतिक्रिया कर्वेंनी दिली आहे.  गेल्या दोन -तीन दिवसांत याठिकाणी पुरावे नष्ट करण्याचं काम झालं असून याबाबतचे पुरावे आपण धर्मादाय आयुक्तांना देणार असल्याचं कर्वेंनी म्हटलंय. तर भुजबळांच्या वकिलांनी हे सर्व आरोप चुकीचे असल्याचं म्हटलंय.First Published: Saturday, April 7, 2012 - 18:28


comments powered by Disqus