मनपात आठ हजार कोटींची थकबाकी !

Last Updated: Saturday, January 7, 2012 - 22:25

www.24taas.com, मुंबई

 

तब्बल २१ हजार कोटींच बजेट असलेल्या मुंबई महापालिकेची आर्थिक स्थिती बिघडलेली आहे. प्रशासकीय आणि राजकीय अनास्थेमुळे तीन वर्षांत तब्बल आठ हजार कोटी रुपयांचा प्रॉपर्टी टॅक्स वसूलच झालेला नाही.  मुंबई महानगरपालिकेचे वार्षिक बजेट एकवीस हजार कोटींचं आहे.

 

सगळ्यात श्रीमंत महानगरपालिकेचा लौकीक असलेल्या मनपाच्या तिजोरीत मालमत्ता कराची थोडीथोडकी नव्हे तब्बल आठ हजार कोटींची थकबाकी आहे. माहितीच्या अधिकारात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. २००९ ते २०११ या तीन वर्षांच्या काळात मुंबईच्या जनतेनं मालमत्ता कराचे आठ हजार कोटी रुपये भरलेले नाहीत.  महापालिका एव्हढी मोठी रक्कम वसूल का करत नाही, त्यासाठी कडक पावलं उचलली का जात नाही, असा सवाल विरोधकांनी केला आहे.

 

एका बाजूला निधीअभावी मुंबईची अनेक विकासकामे रखडली आहेत. असं असताना कर थकबाकीचा डोंगर वाढत चालला आहे. त्यासाठी कठोर भूमिका केव्हा घेतली जाणार असा प्रश्न आहे.

 

 

First Published: Saturday, January 7, 2012 - 22:25
comments powered by Disqus