महापौरांची चमकोगिरी...

Last Updated: Friday, May 25, 2012 - 16:17

www.24taas.com, मुंबई

 

मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांनी पेट्रोल दरवाढीचा निषेध करण्यासाठी गोरेगाव ते सीएसटी असा आज रेल्वेप्रवास केला. नागरिकांनी मात्र महापौरांच्या या चमकोगिरीवर तीव्र नाराजी व्यक्त केलीय.

 

दीड कोटी जनतेची भावना केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण हा रेल्वे प्रवास करत असल्याचं स्पष्टीकरण महापौरांनी दिलं. महापालिकेवर युतीची सत्ता असताना पेट्रोलचे दर कमी करण्यासाठी महापौरांपुढे जकात रद्द करण्याचा पर्याय उपलब्ध असताना तो त्यांनी टाळला. फक्त दिखावूपणा करण्यासाठी महापौरांनी ही स्टंटबाजी का केली? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

First Published: Friday, May 25, 2012 - 16:17
comments powered by Disqus