मुंबईकरांना 'एसी लोकल' मिळणार...

Last Updated: Thursday, June 7, 2012 - 12:09

www.24taas.com, मुंबई

 

मुंबईच्या लोकल  म्हटल्या की गर्दी ही आलीच... लोकलचा प्रवासात सुखाचा व्हावा यासाठी मात्र आता रेल्वेने एक पाऊल पुढं टाकलं आहे... मुंबईकरांसाठी ‘एसी’ लोकल  लवकरच मिळणार आहे. घामाच्या धारांनी भिजलेल्या अवस्थेत रेल्वेतून प्रवास करणार्‍या चाकरमान्यांचा प्रवास आता गारेगार होणार आहे.

 

पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आज चर्चगेट ते विरार आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस ते पनवेल दरम्यान एसी लोकलला हिरवा कंदील दाखवला आहे. पायाभूत सेवांशी निगडित मंत्री आणि सचिवांच्या बैठकीत एलिव्हेटेड रेल कॉरिडोर प्रकल्पाचा निर्णय घेण्यात आला.

 

यासाठी २०१२-१३ या वर्षासाठी २० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर अहमदाबाद चार तासांत पोहचता येणार आहे. ताशी ३५० कि.मी. वेगाने धावून मुंबईहून अहमदाबादला चार तासांत पोहोचणार्‍या बुलेट ट्रेनलाही हिरवा कंदिल मिळाला आहे. त्यासाठी ५०० किमीचा वेगवान ट्रॅक उभारण्यात येणार आहे.

 

 

 

 

First Published: Thursday, June 7, 2012 - 12:09
comments powered by Disqus