मुंबईची लाईफलाईन रूळावर

Last Updated: Friday, April 20, 2012 - 13:43

www.24taas.com, मुंबई

 

 

मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी रेल्वेवाहतूक  तिसऱ्या दिवशी रूळावर आली. मात्र, कुर्ला ते विद्याविहारदरम्यान ती धिम्या गतीने सुरू आहे. मंगळवारी रात्री कुर्ला येथील सिग्नल कंट्रोल रूमला आग लागल्याने सिग्नल यंत्रणेचे तीनतेरा वाजले आणि मध्य आणि हार्बरची रेल्वेसेवा खोळंबली. त्यामुळे मुंबईकर प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. आज तिसऱ्या दिवशी काहीप्रमाणात प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. ९५ टक्के रेल्वे वाहतूक पूर्वपदावर आली आहे.

 

 

मध्य रेल्वेच्या  सिग्नल यंत्रणेला आग लागल्यामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती, ती पूर्ववर्त होण्यासाठी जवळजवळ  तीन दिवस लागले आहेत. आजही मध्य रेल्वेचा खेळखंडोबा काही प्रमाणात  सुरूच आहे. आजही मध्य रेल्वे विद्याविहार ते कुर्ला दरम्यान  धिम्या गतीने धावत आहे. लोकल ट्रेन जवळजवळ ५  ते १० मिनिटे उशीराने धावत आहे, त्यामुळे काही प्रमाणात चाकरमान्यांना त्रास सहन होत आहे. मात्र, तीन दिवसांच्या त्रासांपेक्षा आजचा दिवस  बरा आहे, अशी काही प्रवाशांनी प्रतिक्रिया नोंदवली. हार्बर मार्गावरील वाहतूक  पूर्वपदावर आला आहे.

 

 

सिग्नल केबिन जळाल्यानं गेले दोन दिवस विस्कळीत झालेली मध्य रेल्वेची वाहतूक आता हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलीये. पहाटेपासून मध्यरेल्वेची उपनगरीय वाहतूक वेळापत्रकानुसार सुरु आहे. पहाटेपासून कर्जत कसारा कल्याण ठाणे इथून येणा-या लोकल्स सीएसटी स्थानकात अगदीच थोड्याफार उशीरानं येतायेत. तर लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांची वाहतूकही वेळापत्रकानुसार सुरु आहे. कुर्ला आणि विद्याविहार दरम्यान गाड्यांचा वेग कमी ठेवण्यात येत असला तरी इतर ठिकाणी गाड्यांचा वेग नेहमीप्रमाणं आहे. दोन दिवस त्रास सहन करावा लागलेल्या प्रवाशांना आज सकाळी तरी काहीसा दिलासा मिळालाय. संध्याकाळपर्य़ंत मध्य रेल्वेच्या लोकल गाड्यांची वाहतूक पूर्णपणं रुळावर येईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

 

 

कुर्ला ते सीएसटी दरम्यान सिग्नल व्यवस्था काल व्यवस्थित झाली नसल्याने  रेल्वेसेवा विस्कळीतच होती. डाऊन मार्गावरील सिग्नल यंत्रणा सुरळीत झाली आहे. पण अप मार्गावर मात्र रेल्वे उशीरानेच धावत होती. त्यामुळे  प्रवासाला  एक तास जास्तच लागत होता. त्यामुळे शेकडो प्रवाशांना प्रचंड त्रास झाला होता .

 

 

व्हिडिओ पाहा..

 

[jwplayer mediaid="86193"]

 

 

First Published: Friday, April 20, 2012 - 13:43
comments powered by Disqus