दारूसाठी आईलाच भोसकले, Attack on Mother in Mumbai

मुंबईत दारूसाठी आईलाच भोसकले

मुंबईत दारूसाठी आईलाच भोसकले
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

घोटभर दारूसाठी त्याने आपल्या जन्मदात्या आईलाच भोसकल्याची घटना मुंबईतील वाकोला येथे घडली. याप्रकरणी मुलाला वाकोला पोलिसांनी अटक केलेय. मुलाने हिंदी चित्रपटाचा असिस्टंच डायरेक्टर म्हणून काम केले आहे.

बॉलिवूडचा असिस्टंट डायरेक्टर विशाल नरेंद्रसिंग धनोवा (३८) गेल्या काही दिवसांपासून बेरोजगार होता. त्याला दारूचे व्यसन होते. दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून आपल्या आईलाच भोसकले. आईला मरणाच्या दारात सोडून विशाल पसार झाला. विशालला काल वाकोला पोलिसांनी अटक केली आहे.

विशालने `बिच्छू` आणि `जाल दी ट्रॅप` या दोन हिंदी चित्रपटांमध्ये असिस्टंट डायरेक्टरची जबाबदारी पार पाडली होती. त्याचे वडील नरेंद्रसिंग ऊर्फ गुड्डू ‘जाल’ या चित्रपटाचे निर्माता होते.

वडील नरेंद्र सिंग धनवा आणि आई मीना यांच्यासोबत विशाल सांताक्रुजच्या नीलशांती निकेतन सोसायटीत राहत होता. शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्याने आईकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. आईने नकार दिलाच पण व्यसन सोडण्याबाबत त्याचे कानही उपटले. त्यावरून विशालने आईशी जोरदार वाद घातला. एका क्षणी अचानक विशालने चॉपरसारखे घातक हत्यार आईवर उगारले आणि रागाच्या भरात तिला भोसकले, अशी माहिती पोलिसांनी दिलेय.

या हल्ल्यात गंभीररीत्या जखमी झालेल्या मीना यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. काल त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती वाकोला पोलिसांनी दिली. पोलिसांनी विशालविरोधात हत्येचा प्रयत्न असा गुन्हा दाखल केला.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, June 26, 2013, 08:42


comments powered by Disqus