मुंबई, नवी मुंबईत अपघात सत्र

Last Updated: Thursday, May 31, 2012 - 08:22

www.24taas.com, मुंबई

 

मुंबईमध्ये बुधवारी रात्री वेगवेगळ्या ठिकाणी दोन अपघात झाले. डोंगरी भागात कंपनीचा बॉयलर घेऊन जाणारा ट्रेलर उलटला. मुंबई पोर्ट ट्रस्टवरुन निघालेला हा ट्रेलर गुजरातला जात होता. ड्रायव्हरचा ताबा सुटल्यानं हा ट्रेलर उलटला. ट्रेलरचा ड्रायव्हर फरार असून पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय.

 

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र माहीममध्ये हिंदुजा रुग्णालयाजवळ सेंट्रो आणि ऍसेंट कारमध्ये धडक होऊन झालेल्या अपघातात एक व्यक्ती गंभीर जखमी झालीय. त्याच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भरधाव आलेल्या ऍसेंटने सेंट्रोला धडक दिली. पाच मुलांचा ग्रुप ऍसेंटमध्ये होता. पोलिसांनी या प्रकरणी एका मुलाला अटक केली असून ड्रंक ऍण्ड ड्राईव्हचा गुन्हा दाखल केलाय.

 

दोन दिवसांपूर्वी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर झालेल्या भीषण अपघातांनंतर महामार्गांवरील अपघातांचे सत्र सुरुच आहे. त्यातच बुधवारी साडेतीनच्या सुमारास कैद्यांना घेऊन बेलापूरच्या दिशेने जाणारी पोलीस व्हॅन खारघर-कामोठे इथं ब्रेक डाऊन झाल्यामुळे थांबली होती. या गाडीला पाठीमागून वेगात येणा-या एका क्रुझरनं जोरदार धडक दिली.

 

यात क्रुझरमधील पाच जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाल्याची माहिती खारघर पोलिसांनी दिलीए. जखमींवर कामोठेतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसंच पोलीस व्हॅनचा चालक अशोक बोरके देखील गंभीर जखमी झालाय.

 

 

First Published: Thursday, May 31, 2012 - 08:22
comments powered by Disqus