मुखर्जी-पवार घेणार शिवसेनाप्रमुखांची भेट

राष्ट्रपतीपदाचे युपीएचे उमेदवार प्रणव मुखर्जी आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेणार आहेत. रात्री आठ वाजता मातोश्रीवर ही भेट होणार आहे.

Updated: Jul 13, 2012, 08:52 AM IST

www.24taas.com, मुंबई

राष्ट्रपतीपदाचे युपीएचे उमेदवार प्रणव मुखर्जी आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेणार आहेत. रात्री आठ वाजता मातोश्रीवर ही भेट होणार आहे.

यावेळी मुखर्जी यांच्यासह केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हे सुद्धा बाळासाहेबांना भेटणार आहेत. त्यामुळं ठाकरे-पवार या जुन्या मित्रांचीही भेट होणार आहे. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी शिवसेनेनं मुखर्जी यांना पाठिंबा दर्शवला होता. त्यानंतर बाळासाहेबांना भेटून त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी ही भेट असल्याचं सांगण्यात येतंय. मात्र, अर्ज भरताना युपीएनं उमेदवारीच्या अनुमोदनावर शिवसेनेच्या सह्या घेतल्या नव्हत्या, हे विशेष.