Zeenews logo
English   
Friday, May 24, 2013 
Search
Follwo us on: Facebook Follwo us on: Twiter Follwo us on: google+ RSS Mail to us Mail to us

मोनोरेलचं `वेट अॅन्ड वॉच...`

मोनोरेलचं `वेट अॅन्ड वॉच...` www.24taas.com, मुंबई

‘मोनोरेल’च्या भविष्यातील प्रकल्पांबद्दल एमएमआरडीएने ‘थांबा आणि वाट पहा’ अशी भूमिका घेतली आहे. ‘मोनोरेल’ला मिळणारा नागरीकांचा प्रतिसाद तसंच ‘मोनोरेल’ची सेवा हाताळण्याचा अनुभव लक्षात घेऊनच पुढील निर्णय घेणार असल्याचं एमएमआरडीएचे मावळते आयुक्त राहुल अस्थाना यांनी स्पष्ट केलंय.

लोकल सेवा, मेट्रो सेवा यापेक्षा वेगळ्या तंत्रज्ञानाची रेल्वे म्हणून मोनो रेल्वे ओळखली जाते. भारतात मोनो रेल्वेचं तंत्रज्ञान पहिल्यांदाच वापरलं जातंय. त्यामुळे एमएमआरडीएने मोनो रेल्वेबाबात काही निर्णय घेतले आहेत. या तंत्रज्ञानाचा अनुभव, मोनो रेल्वे चालवण्याचा अनुभव एमएमआरडीए घेणार आहे. मेट्रोच्या तुलनेत कमी गर्दीच्या ठिकाणाहून जाणाऱ्या मोनो रेल्वेला नागरीकांचा प्रतिसाद कसा मिळतो? याची चाचपणीही एमएमआरडीए करणार आहे. त्यानंतर मुंबई आणि परिसरात मोनो रेल्वेच्या प्रास्ताविक आठ मार्गांबाबत निर्णय घेणार आहे. ऑगस्टमध्ये चेंबूर-वडाळा हा पहिला टप्पा सुरु होतोय. तर २०१४ च्या ऑगस्टमध्ये उर्वरीत वडाळा-जेकब सर्कल हा दुसरा टप्पा सुरु होणार आहे.

मोनो रेल्वेचा मार्ग बांधतांना अपघातापासून ते परवानगीपर्यंतचे अनेक अडथळे एमएमआरडीएला पार करावे लागले होते. त्यातच जर नागरीकांचा प्रतिसाद कमी मिळाला किंवा वाहतूक सुरु ठेवण्यात एमएमआरडीएला अडथळे आले तर चेंबूर-वडाळा-जेकब सर्कल हा मुंबईतला मोनो रेल्वेचा पहिला आणि एकमेव मार्ग ठरण्याची शक्यता आहे.


First Published: Friday, March 01, 2013, 08:23

प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

नाव:
ठिकाण:
ई-मेल आयडी:
प्रतिक्रिया: