येवा, कोंकण 'मुंबई'तच असा!

Last Updated: Saturday, April 14, 2012 - 16:29

www.24taas.com, मुंबई

 

मुंबईत सुरु झालेल्या ग्लोबल कोकण फेस्टिव्हलकडे मुंबईकरांची पावलं वळू लागली आहेत. कोकणची खाद्यसंस्कृती ते तिथल्या घरांच्या उपलब्धतेबाबत अनेकजण जाणून घेत आहेत.

 

कोकणची खाद्यसंस्कृती अस्सल खवय्यांना आकर्षित करतेच. ग्लोबल कोकण फेस्टीव्हलमध्ये त्याची प्रचिती येतेच आहे. मात्र मुंबईकरांना कोकणातल्या घरांबाबतही ओढ असल्याचं दिसून येतंय. हिरव्यागार कोकणात आपलं एक सेकंड होम असावं, अशी अनेकांची इच्छा आहे.

 

मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात कोकणचं नैसर्गिक सौंदर्य नागरिकांना भुरळ घालतंय. मात्र गेल्या काही काळात कोकणात रासायनिक कारखान्यांची संख्या वाढल्यानं कोकणचा निसर्ग संकटात आलाय. मात्र आता एकही रासायनिक कारखाना कोकणात येऊ देणार नाही, असं आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिलंय. ज्यांचं रायगड, रत्नागिरी किंवा तळकोकणात सेकंड होमचं स्वप्न असेल त्यांनी ग्लोबल कोकण फेस्टीव्हलमध्ये भेट द्यायलाच हवी.First Published: Saturday, April 14, 2012 - 16:29


comments powered by Disqus