रंगबाधा प्रकरणी दोन जणांना अटक

धारावीतल्या विषारी रंगबाधाप्रकरणी दोन कारखाना मालकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुश्ताक सत्तार सिद्दीकी आणि जाफर सत्तार सिद्दीकी अशी त्यांची नावं आहेत. धारावी पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलंय. मात्र अजूनही चार मालक अद्यापही फरार आहेत.

Updated: Mar 10, 2012, 03:33 PM IST

www.24taas.com, मुंबई

धारावीतल्या विषारी रंगबाधाप्रकरणी दोन कारखाना मालकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुश्ताक सत्तार सिद्दीकी आणि जाफर सत्तार सिद्दीकी अशी त्यांची नावं आहेत. धारावी पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलंय. मात्र अजूनही चार मालक अद्यापही फरार आहेत.

धुळवडीच्या दिवशी धारावीत २०० पेक्षा अधिक मुलांना विषारी रंगाची बाधा झाली होती. या मुलांनी हा रंग धारावीतल्या नवरंग कंपाऊंडमधल्या कारखान्यातून आणला होता.

रंगांच्या बाधेप्रकरणी  राज्य सरकारकडून पाच जणांची चौकशी समिती नेमण्यात आली आहे. ही समिती दोन आठवड्यात आपला चौकशी अहवाल देईल, अशी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली. दरम्यान, यामध्ये एका १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. बंद पडलेले रासायनिक कारखाने आणि विषारी रंग याबाबत सरकारनं गंभीर दखल घेतली आहे. अन्न आणि औषध प्रशासन सुद्ध या प्रकरणी चौकशी करणार आहे.