रन मुंबई, रन !

यावर्षी एकूण ३८ हजार ७७५ स्पर्धक मॅराथॉनमध्ये सहभागी होणार आहेत. यात ४२ किलोमीटर अंतराच्या मुख्य मॅरेथॉनमध्ये २७०८ प्लेअर्स भाग घेणार असून यात २३३ परदेशी प्लेअर्सचा समावेश आहेत.

Updated: Jan 14, 2012, 07:30 PM IST

मेघा कुचिक,www.24taas.com,मुंबई

 

मुंबई मॅरेथॉनला दरवर्षीप्रमाणे यंदाही भरभरून प्रतिसाद लाभत आहे. आतापर्यंत ३८ हजारांहून अधिक स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला असून केनियन आणि इथिओपियाच्या स्पर्धकांकडे विजयाचे संभाव्य दावेदार म्हणून पाहिलं जात आहे. त्याचप्रमाणे यंदाही सेलिब्रिटीज या मॅरेथॉनचे प्रमुख आकर्षण ठरणार आहेत. मुंबईकरांच्या धकाधकीच्या जीवनात एक वेगळात उत्साह निर्माण करणारी मुंबई मॅरेथॉन यावर्षी १५ जानेवारीला आयोजित करण्यात आली आहे. यावर्षी या मॅरेथॉनच हे नववं वर्ष असून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मुंबई मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

 

यावर्षी एकूण ३८ हजार ७७५ स्पर्धक मॅराथॉनमध्ये सहभागी होणार आहेत. यात ४२ किलोमीटर अंतराच्या मुख्य मॅरेथॉनमध्ये २७०८ प्लेअर्स भाग घेणार असून यात २३३ परदेशी प्लेअर्सचा समावेश आहेत. तर २१ किलोमीटर अंतराच्या हाफ मॅरेथॉनमध्ये १३९४६ एथलिट सहभागी होणार आहेत. यामध्ये २६४ परदेशी प्लेअर्सचा समावेश आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही केनियन आणि इथिओपियाच्या स्पर्धकांचे मुंबई मॅरेथॉनमध्ये वर्चस्व दिसून येत आहे. केनियाचा बर्नार्ड कोसगे आणि इथिओपियाचा सिराज गेना हे मुख्य मॅरेथॉनचे संभाव्य दावेदार मानले जात आहेत. तर ६ किलोमीटर ड्रीम रन गटामध्ये २०५०० नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला असून सिनिअर सिटीझन गटात १२५१ स्पर्धक सहभाही होण्यास सज्ज आहेत. तर व्हीलचेअर गटात ३७० स्पर्धक भाग घेणार आहेत.

 

मॅरॉथॉनच प्रमुख आकर्षण असलेल्या सेलिब्रेटींमध्ये यावर्षी माधुरी दीक्षित, अनिल कपूर, सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर, अनिल अंबानी, रणबीर कपूर, सिध्दार्थ मल्ला, धनराज पिल्लेसहित अनेकजण सहभागी होणार आहेत. यावर्षी एकंदर ३ लाख ४० हजार अमेरिकन डॉलरची बक्षीसांचे वाटप करण्यात येणार आहे.