राजीव गांधी यांच्या नावावर...

मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला राजीव गांधी यांचं नाव देण्यात यावं, अशी मागणी राज्यातील काँग्रेस नेत्यांनी केलीय. खासदार संजय निरूपम यांच्यासह काँग्रेसच्या पन्नास खासदारांनी रेल्वेमंत्र्यांकडे ही मागणी केलीय.

Updated: May 20, 2012, 05:48 PM IST

www.24taas.com, मुंबई

मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला राजीव गांधी यांचं नाव देण्यात यावं, अशी मागणी राज्यातील काँग्रेस नेत्यांनी केलीय. खासदार संजय निरूपम यांच्यासह काँग्रेसच्या पन्नास खासदारांनी रेल्वेमंत्र्यांकडे ही मागणी केलीय.

याआधी रिपाई नेते रामदास आठवले यांनी मुंबई सेंट्रलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव द्यावं, अशी मागणी केली होती. त्यामुळं आगामी काळात राज्यात नवा राजकीय संघर्ष निर्माण होण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. मुंबई सेंट्रलला नाना शंकरशेठ यांचं नाव देण्याची शिवसेनेची मागणी होती. मात्र, आरपीआयच्या मागणीनंतर शिवसेनेनं नाना शंकरशेठ यांचं नाव देण्याची भूमिका मागे घेतली होती. आता काँग्रेसनं मुंबई सेंट्रलला राजीव गांधींचं नाव देण्याची भूमिका घेतल्यानं शिवसेना आणि आरपीआय हे महायुतीतले घटक पक्ष जोरदार विरोध करण्याची चिन्हं आहेत.

नुकतंच, माहिती नियोजन आयोगाचे राज्य मंत्री अश्वीनी कुमार यांनी, देशातील २५ टक्क्यांहून अधिक योजनांना स्वर्गीय राजीव गांधींच्या नावे असल्याचं स्पष्ट केलं होतं. देशात नामवंतांच्या नावे सुरू केलेल्या ५८ योजना असून त्यातील १६ योजनांना तर फक्त राजीव गांधींचंच नाव देण्यात आलं आहे, असंही यावेळी त्यांनी निदर्शनास आणून दिलं होतं.